किरकोळ पावसात अधिकारी, ठेकेदार यांची निष्क्रियता उघड

मार्च 8, 2022 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । काळ रात्री पासून किरकोळ पाऊस सुरू झाला. यामुळे यावल शहरातील तिरुपती नगर, फालकनगर, आयेशा नगर , काजी नगर , एसटी स्टँड परिसर व इतर काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर यावल चोपडा रोडवर वढोदे गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर साकळी जवळ आज 8 रोजी सकाळी नदीवरील पुलावर पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने वाहतूकदारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.

yawal 3

अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा आरोप

किरकोळ पावसामुळे वीजपुरवठा खंडित आणि पावसाचे पाणी पुलावर साचुन असल्यामुळे तसेच कामांमध्ये टक्केवारीचे प्रमाण वाढल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता उघड झाली आहे. अधिकारी कर्मचारी व ठेकेदार लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांचे नियत्रण राहिले नसल्याचा आरोप सुद्धा नागरिकामधून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now