जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । के सी ई च्या आय एम आर मध्ये करिअर मार्गदर्शन, करिअर परामर्श आणि करिअर मेला. आय एम.आर, नेहरू युवा केंद्र, जळगाव जिल्हा प्रसासन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाश कुमार मनोरे, मिलन राणा,एच आर मॅनेजर,रेमंड,आणि मनोज गोविंदवार उपस्थित होते.

या प्रसंगी प्रस्तावना करतांना आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेडाळे म्हणाल्यात, उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून कार्य कराल. संधीचे सोने करुन आहे त्या वातावरणातून मोठे व्हा.आणि तुमच्या करिअरला योग्य दिशा द्या. नोकरी करा किंवा उद्योग करा.. पण एक बेंजमार्क स्थापित करा. त्यानंतर नेहरू युवा केंद्रातर्फे नरेंद्र डागर, नेहरु युवा केंद्र जिल्हा प्रमुख, यांनी सांगितले, “करीयर अवेअरनेस साठी एज्युकेशन आणि करीयर यात पुल बांधण्याचे काम आम्ही करीत आहोत. काळाची पाऊले कोणत्या दिशेने जात आहे हे तरुणांच्या लक्षात आणुन देणे आमचे काम आहे. त्यानंतर बोलतांना प्रकाश मनोरे, स्टेट डायरेक्टर, नेहरु सेंटर यांनी, “अवसर खोजना आपके हातमे है. गोल आणि टारगेट अचिव्ह करना कठीण काम है. आभावमे जिना मेहनत करायला भाग पडते.. त्यात रिस्क असते. पण रिस्क तर प्रत्येक क्षेत्रात आहे. व्यवसायात सुध्दा रिस्क आहे.नोकरीच्या मागे लागु नका.रिस्क घेतली नाही तर मागे पडाल.डिक्लाईन होऊन जाल..संकल्पामध्ये विकल्प आला तर पाॅब्लेम येतो. इथुन मुंबईला जायला निघाल तर मुंबईलाच पोहोचा. इगतपुरी पासुन डायव्हर्ट होऊ नका. सुर्यासारखे चमकायचे असेल तर धुप सहन करायलाच हवे.

त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी, अभिजीत राऊत म्हणालेत, करिअर तुमच्या चाॅईसप्रमाणे ठरवा.कुणाच्याही इंन्फुईंन्सने ठरवू नका. सगळेच जातात त्या मार्गाने ना जाता तुमचा मार्ग निवडा.स्पर्धा परीक्षा पास झाल्यात तर रेडीमेड स्टक्चर मिळते..पण त्यापलिकडेही करीयर असते. स्वत:ची तुलना कुणाशीही करु नाका. करीयर करतांना मेंटल सपोर्ट फॅमिलीचा फार आवश्यक असतो. आता फ्युईडीटी आली आहे.मेडीकल ग्रॅज्युएशन नंतर मॅनेजमेंट करणारेही आहेत. कुणी सिव्हिल सर्व्हिस मध्येही जातात. पण जे ठरवाल ते काम नीट होईल, वेळ प्रसंगी प्लॅन बी तयार ठेवा.जेणेकरुन करीयर व्यवस्थित सेटल करा. युपीएससी करतांना बॅक अप तयार हवा. नाही जमले तर प्लॅन बी तयार असेल मग त्रास होत नाही. हॅल्यू एडीशन करत रहा .त्याचा फायदा नक्कीच मिळतो. उद्योजकांची रिस्क घ्या, तुमच्या विद्यापिठाच्या इनोव्हेशन सेंटरची मदत घ्या.या चार टिप म्हणुन लक्षात ठेवा,रिस्क घ्या वेगळा विचार करा. स्वत:करीयर निवडा. करिअरच्या फ्युईडिटीचा योग्य उपयोग करा.करीयल बॅक अप ठेऊन प्लॅन करा. शेवटी आम्ही गाईड करु शकतो. निर्णय तुमचा असेल. त्यानंतर बोलतांना की नोट स्पिकर, श्री मनोज गोविंदवार म्हणालेत, तुमच्या योग्यतेचे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहात नाही. तुमचे करीयर तुमचे स्वागत करण्यासाठी उभे आहे. पण तुम्ही दोघेही एकमेकांना का सापडत नाही. आज जवळजवळ सातशे वेगवेगळे करीयर उपलब्ध आहेत. त्याशिवाय आज तुमच्यापेक्षा 100 पट जास्त बुद्धिमान असलेले रोबोट तयार होत आहेत. त्यामुळे 4 सी लक्षात, क्रीएटीव्हिटी जी गोष्टीला बदलून टाकते. कोलॅबरेशन ही तुमच्या कामाची किंमत असेल क्रिटीकल थिंकीग, आपल्याला बर्याचदा बोलता येत नाही..सांगता येत नाही..इथे एक कविता लक्षात ठेवा, लव्हलेटर..थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी असतें बोलता आले पाहिजे..तसेच लिहीता ही आले पाहिजे.यापुढे जाॅबमध्ये 90 टक्के रोबोट काम करणार आहे. आणि 10 टक्के मध्यें तुम्ही असाल. तेव्हा उपयोगिता वाढवा. आजही आपण फार ठिकाणी गुंततो..फोकस होत नाही ..आयुष्यात बदल घडवायला संधी बाहेरून येणार नाही. ती आतुन शोधावी लागेल. तुमचे सिलेक्शन होऊन जाईल हिचा अंधश्रध्दा आहे. संदर्भ म्हणून त्यांनी विं दात ची कविता सांगितली. देखणे ते चेहरे, गोरटे ते सावळे त्याचे मोल नाही. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमचे स्माईल महत्त्वाचे असतें. तूमचा मेक अप तोपर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही धाडसी होत नाही. सगळ्यात मोठे क्लालीफीकेशन आहे धाडसी..भिती वाटत असतांनाही धाडस दाखवणे..हे महत्त्वाचे आहे.संधी आहे ,स्वत:ला चेंज करा..सुर्याला झाकुन ठेवता येत नाही.तुम्हाला विचार करतां आला नाही.तुम्हाला स्वत:ला भेटता आलें नाही तर गडबड होईल.लगेच चान्स मिळेल असे होत नाही.ज्याला स्वतंत्र विचार करता येतो..जुळवून घेताना येते.तो करीयर चांगले करु शकतो..लक्षात ठेवा, वस्तू ब्रॅण्डेड नसल्या तरी चालतील..पण तुमचे आयुष्य ब्रॅन्डेड करा…आज माणसांना काढलें जातेय..तुम्ही प्रसन्न असले पाहिजे.क्रीऐटीव्ह असलेच पाहिजे.
आपण सायकाॅलिकली स्टाॅन्ग व्हा.त्यानंतर रेमंडचे एच आर.मिलन राणा विद्यार्थ्यांशी बोलतांना म्हणालेत,स्मार्ट फॅक्टरी आल्या आहेत.सायबर फिझीकल वर्ड मुळे हे शक्य होते आहे.काॅम्पिटरची डिसीजन घेण्याचीही पाॅवर वाढते आहे.त्यामुळे स्मार्ट फॅक्टरी डिझाईन होत आहेत. एडव्हान्स प्राॅडक्शन होते आहे. व्हरटिकल इंन्व्हेन्टरी ,प्राॅडक्शन डाटा, सायबर थ्रेट चा परीपुर्ण विचार होतो आहे.ब्लाॅक चेन टैक्नाॅलाॅजी वापर वाढतो आहे. ह्या इंडस्ट्रीत दर वर्षी 50 रोबोट सामिल होत आहे. मेडेट्रिक वाॅच आली आहे . स्मार्ट होम बनता आहेत. स्मार्ट कार आली आहेत .या गोष्टी मुळे बेरोजगारी वाढायला नको म्हणून काय करता येईल यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. माणसांमधील क्रिएटिव्हीटी वाढायला हवी.इमोशनल इंटिलीजन्स वाढायला हवा आहे.गुगल आणि अ़ॅपल स्टोअर 30 लाख अ़ॅप तयार आहेत. मेडीकल रोबोट तयार आहेत.जपान, जर्मनीत हे घडते आहे. तेव्हा आता जाॅबसाठी वाट बघू नका..टेक्नाॅलाॅजीकल स्टार्ट अप साठी तयारी करा.न्यु स्टार्ट अप साठी माहिती ठेवा.अ़ॅनेलेटिक्स साठी तयार राहा.कंझ्युमर वाढले आहे.तुमचे स्कील वाढवा.तर टिकाल.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रणिलसिंग चौधरी याने केले तर आभार प्रा डॉ शमा सराफ यांनी मानलें.
हे देखील वाचा:
- जळगावातील महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चौघे गंभीर जखमी
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
- जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांची मोठी कारवाई; ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, २१ जणांवर गुन्हे दाखल












