जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । बडोद्याहून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात चाळीसगावच्या औट्रम घाटात १४ जुलैला झाला होता. यात (जी.जे.१६-ए.यू. ७९९७) हा ट्रक जळाला होता. अपघातानंतर हा ट्रक घाटाच्या पायथ्याशी असलेल्या राज ढाब्यावर लावला होता. त्या ठिकाणाहून ट्रक चोरीस गेल्याने, ट्रकमालकाने थेट पोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठून ढाबामालकाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
बडोदा येथील राजूभाई करंगीया यांच्या मालकीचा ट्रक १२ जुलैला हैदराबाद येथे टाइल्स घेऊन जात होता. औट्रम घाटात १४ जुलैला पहाटे ट्रकचा अपघात झाला. पंचनामा केल्यानंतर हा ट्रक क्रेनद्वारे छोटू पैलवान यांच्या ढाब्यावर लावला होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी १२ ऑगस्टला ढाब्यावर ट्रकची पाहणी केली. यानंतर २५ व २८ सप्टेंबरला पुन्हा पाहणी केली. नंतर २६ डिसेंबरला हा ट्रक गायब झाला. याबाबत छोटू पैलवानला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवी केली होती.
यापूर्वीही चोरीचे प्रकार
कन्नड घाटात नेहमी अपघात होतात. अनेकदा अपघातग्रस्त चालक वाहने त्याच ठिकाणी सोडून निघून जातात. अशी अनेक वाहने आजवर अनेकदा चोरीस गेलेली आहेत.अपघातग्रस्त वाहन भंगारात विकून चोरटे मोकळे होतात. आजवर या पद्धतीने अनेक वाहने चोरीला गेली आहेत.
हे देखील वाचा :
- Chalisagaon : चुलत दिरासह प्रेम संबंध! पत्नीने अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून
- चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
- जळगावला स्टार्टअप हब बनविणार : स्मिताताई वाघ यांची जळगाव स्टार्टअप ग्रृपसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’
- चाळीसगाव हादरलं : प्रेमसंबंधातून महिलेवर बलात्कार करून हत्या
- जळगाव महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड यांची अखेर बदली