सोन्याचा भाव स्थिर, तर चांदी स्वस्त, खरेदी करण्याची खास संधी, वाचा आजचे भाव

ऑक्टोबर 29, 2021 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतात ऐन सणासुदीच्या दिवसात सोने आणि चांदीचे भाव वाढताना दिसून आले. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस प्रति तोळा ४७ हजाराच्या घरात असलेला सोन्याचा भाव ४९ हजारांवर गेला आहे. दरम्यान, आज जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोन्याचा भाव स्थिर असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे चांदीच्या भावात घसरण दिसून आलीय. आज चांदी प्रति किलो २४० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १६० रुपयांची तर चांदीच्या भावात प्रति किलो १८० रुपयाची वाढ नोंदविली गेली.

gold

आजचा सोने आणि चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,४५० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार देशात तसेच स्थानिक पातळीवर सोन्याच्या भावांत चढ-उतार होत असतो. तसेच देशांतर्गत उलाढालींचा परिणामही सोन्याच्या दरांवर होतो. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील सोने खरेदीचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढीकडे झुकलेले दिसून येत आहेत. दिवळीनंतर हे भाव आणखी वाढणार असल्याचे संकेत जाणकारांनी दिले आहेत.

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्याचा भाव ४७ हजारांच्या घरात आला होता. त्यानंतर सणासुदीत सोन्याचे आणखी कमी होतील, असं वाटत होते. मात्र. या ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भावात मोठी वाढ होऊन तो पुन्हा ४७ हजारावर गेला. त्यानंतर सोन्याच्या भावात सतत वाढ दिसून आली. गेल्या दिवाळीत सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५२,१२० इतका होता. त्यामुळे सोने रेकॉर्ड पातळीपेक्षा ३००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

तर दुसरीकडे चांदीचा भाव सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ६० हजाराच्या खाली आला होता. परंतु या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच पासून चांदीचा भाव वधारू लागला. १ ऑक्टोबर २०२१ पासून ते आतापर्यंत चांदीच्या भावात ६५०० हजार रुपयांची वाढ झाली आहे. परंतु दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.  तर दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (२५ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९२० होते, त्यात ४०० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती. मंगळावारी (२६ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० इतका होता. त्यात ४४१० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२७ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,९३० रुपये इतका आहे. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०९० रुपये प्रति तोळा इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now