दिवाळीनंर सोन्याचा भाव ६० हजार रुपयांपर्यंत जाणार? वाचा आजचे भाव

ऑक्टोबर 23, 2021 10:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरांनी सलग चढणीचा आलेख दर्शवला आहे. सप्टेंबर महिन्यात विक्रमी निचांकी पातळी गाठल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मात्र सोने आणि चांदीचे भाव काहीशे वाढलेले दिसून येत आहेत. आता बाजार पेठेमध्ये दिवाळीसाठी नागरिकांची खरेदीची लगबग दिसून येत आहे. दरम्यान, दिवाळीनंर सोन्याचा भाव ५७ ते ६० हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

gold silver jpg webp

जळगावात काय आहेत भाव?

जळगाव सराफ बाजारात  २२ कॅरेक्ट सोन्याच्या भाव ४५,७३० प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५२० रुपये प्रति तोळा एवढे झाले. चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,५४० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते

या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीचे भाव वधारू लागले आहे.१ ऑक्टोबरला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७४१० रुपये इतका होता. तर चांदीचा प्रति किलो ६१ हजार रुपये इतका होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या भावात १११० रुपयाची वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात ५५०० रुपयाची मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव चांगलाच वधारेल, असे म्हटले जात आहे. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते १२ ते १४ हजार प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

आठवड्यातील सोने दर?

सोमवारी (१८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० होते, त्यात ७२० रुपयाची घसरण झाली होती. मंगळावारी (१९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,४०० इतका होता. त्यात किरकोळ ८० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२० ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३९० रुपये इतका आहे. त्यामध्ये १० रुपयाची किंचित घट झाली होती. गुरुवार (२१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे. शुक्रवार (२२ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५२० रुपयाने इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now