अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी न्यायालयाने सुनावली पाच दिवसाची पोलीस कोठडी

ऑक्टोबर 16, 2021 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान, धरणगाव पोलीसांनी गुरुवार दि.१४ रोजी सायंकाळी तरूणाला अटक करून शुक्रवार दि.१५ रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एन.खडसे यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

court

धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तुकाराम माधव बेलदार (वय-२०) याने फूस लावून ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पळवून नेले होते. नाशिक येथे नातेवाईकांकडे थांबल्यानंतर तिथे पिडीत मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी गावातील सरपंच यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुरूवार दि.१४ रोजी तरूणीची वैद्यकीय तपासणी करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले तर संशयित आरोपी तुकाराम बेलदार या तरूणाला धरणगाव पोलीसांनी सायंकाळी ४ वाजता अटक केली. शुक्रवार दि.१५ रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एन.खडसे यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now