सोशल मीडियात स्टेटस ठेवून प्रेमीयुगुलाची शाळेतच आत्महत्या

ऑगस्ट 2, 2021 12:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२१ । भडगाव तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक शाळेत रात्री एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मयत तरुणाने रात्री सोशल मीडियावर बाय असे स्टेटस ठेवले होते.

wade jpg webp

भडगाव तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयात रात्री २२ वर्षीय तरूण आणि १९ वर्षीय तरूणीने गळफास घेतला. माध्यमिक विद्यालयातील पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह भडगाव पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा यातील तरूण हा मुकेश कैलास सोनवणे (वय २२, रा.वाडे, ता. भडगाव) आणि तरूणी रुपाली (नाव बदलेल आहे) असल्याचे समजले. दोघांचे मृतदेह खाली उतरवून त्यांच्या पार्थिवाला शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून मयत मुकेश कैलास सोनवणे व नेहा बापू ठाकरे यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे हे करीत आहेत.

दोन्ही मयत एकच गावातील, एकच समाजाचे
आत्महत्या करणारा तरूण मुकेश सोनवणे आणि तरूणी नेहा ठाकरे दोन्ही एकाच गावातील असून एकाच समाजाचे असल्याचे समजते. समाजाकडून विवाहाला मान्यता मिळणार नसल्याच्या भितीपोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now