
जळगाव लाईव्ह न्यूज । MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील दिरंगाईच्या मुद्द्यावरून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीका केली. तसेच भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
“काळ्याकुट्ट नकली भुवया घेऊन रेकॉर्ड करून विचित्राताई येते आणि सांगते एमपीएससीचं आंदोलन नौटंकी आहे. अगं बाई, तू ये… तू येच,” अशा शब्दांत खडसेंनी टीका केली. आदरणीय ताईंना पायाला 56 बांधून फिरायची सवय त्याच्यामुळे त्यांना आपल्या आंदोलनकर्त्यांची तळमळ समजणार नाही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्यांनी आधी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांची व्यथा समजून घ्यावी, असेही त्यांनी सुनावले.
दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या या टीकेवर आता चित्रा वाघ यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी पोस्ट करत म्हटलंय की, “खरं तर कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं आम्हाला आवडत नाही, पण जेव्हा रोहिणी खडसे राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडतात, तेव्हा त्यांना आरसा दाखवावाच लागतो! MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर खालच्या पातळीत बोलण्यापेक्षा, रेव पार्टीत नाव आलेल्या पतीच्या प्रकरणांवर उत्तर द्या! आमचा नियम स्पष्ट आहे, “हम किसी को छेडते नही… और अगर किसीने छेडा, तो छोडते नही!”





