
जळगाव लाईव्ह न्यूज । मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होताना दिसत असून आजही जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही धातू स्वस्त झाले आहेत. बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,५०० रुपयांपर्यंत, तर चांदीच्या भावात प्रति किलो ४ हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली. लग्नसराई सुरु होण्याआधीच सोने आणि चांदी दरात सुरु असलेल्या घसरणीमुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर
आजच्या दरानुसार, जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख १९ हजार ५४० रुपये झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३० हजार ५०० रुपये नोंदवण्यात आला आहे. कालच्या तुलनेत २२ कॅरेट सोन्यात १ हजार ३७० रुपयांची, तर २४ कॅरेट सोन्यात १ हजार ५०० रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली आहे. जळगावच्या बाजारात आज चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ६५ हजार रुपये झाला आहे. काल चांदीचे दर १ लाख ६९ हजार रुपये होते. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या भावात प्रति किलो ४ हजार रुपयांची घट झाली आहे.
दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, सराफ बाजारातील दरांमध्ये दिवसभरात बदल होऊ शकतो. तसेच प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना जीएसटी आणि घडणावळ शुल्कामुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते.





