भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

सप्टेंबर 3, 2026 3:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळातील वांजळा रोडवरील आपल्या परिवार सामाजिक वाचनालयात दि. ३ सप्टेंबर रोजी स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.

godavari aai

ज्येष्ठ नगरसेवक अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात स्व. गोदावरी आईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोदावरी आईंच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक व सेवाभावी कार्याचा गौरव केला. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे तसेच समाजातील विविध घटकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांची आठवण सदैव प्रेरणादायी राहील, असे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात जयंत जंजाळे यांनी पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपस्थित वक्त्यांनी स्व. गोदावरी आईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन उत्साहात करण्यात आले. उपस्थितांच्या वतीने स्व. गोदावरी आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now