
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळमार्गे मुंबई किंवा उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने दादर–गोरखपूर आणि दादर–बलिया दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांना आता नियमित मेल/एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या गाड्या नवीन नियमित क्रमांकासह धावणार असून, प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

दादर–गोरखपूर एक्स्प्रेस झाली नियमित
विशेष गाडी क्रमांक ०१०२७ दादर–गोरखपूरचे आता नियमित ११८४७ दादर–गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ही गाडी १८ ऑगस्टपासून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दादर स्थानकावरून सुटत आहे.

परतीच्या दिशेने ११०४८ गोरखपूर–दादर एक्स्प्रेस २० ऑगस्टपासून नियमित धावत आहे. त्यामुळे मुंबई आणि उत्तर प्रदेशदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक नियमित रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे.
दादर–बलिया एक्स्प्रेसलाही नियमित दर्जा
दरम्यान, विशेष गाडी क्रमांक ०१०२५ दादर–बलियाचे रूपांतर नियमित ११०४३ दादर–बलिया एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. ही गाडी १७ ऑगस्टपासून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावत आहे.









