गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात भव्य आरोग्य संपदा शिबिर

सप्टेंबर 3, 2026 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गणेश चतुर्थी, दसरा व दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.

drup122

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड, नसल्यास ओरिजिनल रेशन कार्ड तसेच आधार कार्ड घेऊन नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातर्फे शासकीय योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या विविध आजारांवर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरात हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, फुफ्फुसांचे आजार, किडनी विकार, ताप, सर्दी, खोकला, पोटाचे विकार, अ‍ॅसिडिटी, अपचन, रक्तक्षय, सांधेदुखी, कावीळ आदी आजारांसाठी बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच डायलिसिस, ब्रॉन्कोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि २ इको कार्डिओग्राफी यांसारख्या आधुनिक वैद्यकीय तपासणी व उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अंतर्गत रुग्ण विभागात दमा, न्यूमोनिया, क्षयरोग, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे, श्वसनविकार, अपघात व दुखापती, स्ट्रोक, विषबाधा, साप-विंचू दंश, बेशुद्धावस्था, फिट्स, कोमा तसेच ताप, संसर्ग व सेप्सिस यांसारख्या आपत्कालीन स्थितींवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.तपासण्या व औषधोपचारात विशेष सवलतशिबिरादरम्यान रुग्णांना आवश्यक तपासण्या व औषधोपचारांमध्ये विशेष सवलत देण्यात येणार असून, रुग्णवाहिका समन्वय सेवा, व्हेंटिलेटर, क्रिटिकल केअर आणि अत्याधुनिक आयसीयू सुविधाही उपलब्ध आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक रक्ताची तयारी मोफत करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. शिबिरात डॉ. युवराज बढे व डॉ. रोशन राजपूत यांच्यासह विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now