जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर्सचा सन्मान; रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा उपक्रम

ऑगस्ट 19, 2026 5:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक छायाचित्र दिनानिमित्त १९ ऑगस्ट रोजी स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात जळगाव शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर बांधवांचा सन्मान करण्यात आला.

photographer

यांची होती उपस्थिती?

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, डीवायएसपी सह्याद्री बिर्ले, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचे अध्यक्ष रोहित आहुजा, सचिव धनराज कासट, योगेश सांखला, विनीत आहुजा, दर्शन जैन, तरुण ऐदासनी, तुषार भांबरे, रजत भोळे, युवराज परदेशी आणि डी.जे. शिवाचे किशोर पाटील यांच्यासह शहरातील अनेक फोटोग्राफर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून छायाचित्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती आणि आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करणाऱ्या फोटोग्राफरांच्या योगदानाचे कौतुक केले.

कार्यक्रमासाठी क्लबचे सदस्य प्रकाश मुळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. विराज फोटोग्राफीचे प्रकाश मुळे यांनी प्रास्ताविक केले, तर उदय बडगुजर यांनी आभार मानले. ‘छायाचित्र केवळ क्षण टिपत नाही, तर त्या क्षणाच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करते,’ या भावनेतून जागतिक छायाचित्र दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now