भावजयीच्या खुनातील दीराला जन्मठेप; पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सासूलाही ३ वर्षांची शिक्षा

ऑगस्ट 19, 2026 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भावजयीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिने विरोध केल्याने तिचा खून करणाऱ्या दिराला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण छगन बैरागी (२६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची आई तथा मयतेची सासू लीलाबाई बैरागी हिला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी हा महत्त्वाचा निकाल दिला.

court jpg webp

महिलेचे पती सीआयएसएफमध्ये नोकरीला असल्याने ती गावी सासू आणि दीरासोबत राहत होती. ३ जुलै २०१८ रोजी रात्री महिला आपल्या मुलीसह झोपलेली असताना प्रवीण बैरागी याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्याने प्रवीणने तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मयत महिलेची मुलगी, तपासाधिकारी दिलीप शिरसाठ, जयपाल हिरे आणि हेमंत शिंदे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले.

साक्षीपुराव्यानंतर न्यायालयाने प्रवीणला खून प्रकरणी जन्मठेप व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास, बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी व १० हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिने साथी कैद, पुरावे नष्ट केले म्हणून तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार दंड व दंड न भरल्यास दोन महिने साथी कैद तर सासू लीलाबाईला पुरावे नष्ट केले म्हणून तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now