जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२६ । इराणवर अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेला संबोधित केल्यानंतर जागतिक बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या घडामोडींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावरही दिसून आला आहे. आज गुरुवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. सोबतच चांदी दरातही घसरण झाली. ऐन लग्नसराईत दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

२४ कॅरेटचा भाव
आज २४ कॅरेट सोन्याचे दर १५३० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५१,४२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १,२२४ रुपयांनी स्वस्त झाल असून हे दर १,२१,१३६ रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३८,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१२० रुपयांनी घसरले असून १,११,०४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १४,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १३,८८,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याचे दर १,१४० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१३,५७० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९१२ रुपयांनी घसरले असून ९०,८५६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ११,४०० रुपयांनी घसरले असून ११,३५,७०० रुपये झाले आहेत.
चांदीच दर
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरात ही मोठी घसरण झाली. आज गुरुवारी सकाळी चांदी दरात ५००० रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा भाव २,५०,००० रुपयावर पोहोचला आहे.











