जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे भारतासह अनेक देशांना फटका बसला आहे. इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर झाला असून संपूर्ण जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे युद्ध कधी थांबत याची सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून आहे. मात्र अशातच जगाला मोठा दिलासा देणारी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेने इस्रायल-इराण युद्ध कधी थांबणारी याची थेट तारीखच जाहीर केली आहे.

अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी 9 एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. इराणमध्ये जे काही नष्ट करता आले, ते सर्व अमेरिकेने नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणसोबत 15 मुद्द्यांवर एक करार झाला असल्याची माहितीही ट्रम्प यांनी दिली आहे. दरम्यान, इराणला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याने मध्य-पूर्वेत शांततेचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा दावाही केला होता.

15 मुद्द्यांवर करार?
युद्धबंदीसंदर्भात आणि शांततेसंदर्भात दोन्ही देशांमधील चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात असून सुमारे 15 मुद्द्यांवर करार झाले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. इराणसोबतच्या चर्चेतूनच सर्वसमावेशक करार शक्य आहे की नाही हे ठरेल. इराणने सुरुवातीला अमेरिकेसोबत चर्चा करण्यास नकार दिला होता, परंतु नंतर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरु असल्याचे दोन्ही देशातील नेत्यांकडून अप्रत्यक्षपणे मान्य करण्यात आलं आहे.
मुस्लिम देशांची मध्यस्थी
इस्राय-इराण युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देश मध्यस्थीसाठी समोर आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी करार झाला, तर तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरतील. संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नात तुर्की, इजिप्त आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी व्हाईट हाऊसचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांची भेट घेतल्याची माहिती पुढे येत आहे.











