Voter ID नाही? काळजी नको ! जळगावकर या’ 12 पुराव्यांच्या आधारे करू शकणार मतदान!

जानेवारी 14, 2026 4:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा मंगळवारी सायंकाळी अधिकृतपणे थंडावला असून यानंतर आता मतदान प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. उद्या १५ जानेवारीला मतदान होईल तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. परंतु, मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे यादीत नाव आहे, अशा मतदारांसाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे.

Voting evidence

मात्र, एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे जळगावकरांना मतदान कार्ड नसलं तरी चिंता करण्याची गरज नाहीय. 12 पुराव्यांच्या आधारे तुम्ही मतदान करू शकणार आहे. ते नेमके कोणते १२ पुरावे आहेत ते जाणून घ्या..

हे १२ पुरावे धरले जाणार ग्राह्य?
आधार कार्ड, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्टाने जारी केलेले फोटोसहित पासबुक, कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, भारतीय पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन दस्तऐवज, आमदार, खासदार आणि विधान परिषद सदस्यांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र, युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड, स्मार्ट कार्ड या ओळखपत्रांचा समावेश आहे.

दरम्यान, मतदानाच्या दिवशी गुरुवारी सकाळी ६.३० वाजता उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल होईल. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान चालेल. मात्र, ५.३० वाजता जे मतदार रांगेत असतील, त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now