जळगाव शहर

रथोत्सवापूर्वी रस्ते चकाचक करा; लोंबकळणाऱ्या केबल्स हटवा, महापौर काळेंचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या ऐतिहासिक रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. १७) संपूर्ण रथोत्सव मार्गाची पाहणी केली. श्रीराम मंदिर संस्थानपासून जुने जळगाव परिसरातील विविध गल्ल्यांमधून जाणाऱ्या रथाच्या मार्गाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

पाहणीदरम्यान रथाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या तसेच रस्त्याच्या मधोमध किंवा खाली लोंबकळणाऱ्या विद्युत केबल्स तातडीने बाजूला करण्याच्या सूचना महापौरांनी विद्युत विभागाला दिल्या. रथोत्सवाच्या दिवशी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण मार्गाची आवश्यक तपासणी करून कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांची डागडुजी तातडीने करण्याच्या सूचना
रथोत्सव मार्गावरील खराब रस्ते आणि प्रलंबित कामांकडेही महापौरांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. रस्त्यांची डागडुजी करून रथोत्सव तसेच वाहतुकीसाठी मार्ग सुस्थितीत करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

याशिवाय रथोत्सव काळात भाविक आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक कल्पेश सोनवणे, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button