जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ते. भुसावळ मार्गे पुणे ते सुपौल दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून हा बदल तत्काळ प्रभावाने राबविण्यात आला आहे.

पूर्वीचा गाडी क्रमांक १२१४९ पुणे-सुपौल एक्सप्रेस आता ११४०१ असा तर पूर्वीचा गाडी क्रमांक १२१५० सुपौल-पुणे एक्सप्रेस असा होता तो आता ११४०२ असा असेल.

मार्ग, वेळापत्रक, प्रस्थान-आगमन वेळा तसेच कोच रचना जशीच्या तशी कायम ठेवली आहे. प्रवाशांना तिकीट बुक करताना आणि स्टेशन/ऑनलाइन माहिती तपासताना नवीन ट्रेन क्रमांक वापरण्याची विनंती करण्यात आली आहे.












