जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. NHM CHO Bharti 2025

त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://nhm.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालीय. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. NHM Recruitment 2025

पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO | 1974 |
| Total | 1974 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
या नोकरीसाठी बीएएमएस, बीयुएमएस,बीएससी नर्सिंग, बीएससी इन कम्युनिटी हेल्थ पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी मेडिकल विषयातील पदवी मिळवलेली असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
वयाची अट: 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]











