जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदानं 1100 पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. सरकारी बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही मोठी संधी निर्माण झाली आहे. Bank of Baroda Bharti 2026

बँक ऑफ बडोदाकडून वेल्थ एक्झिक्यूटिव्ह आणि क्रेडिट अनालिस्ट या दोन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज दाखल करु शकतात. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 4 सप्टेंबर 2026 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. बँकेनं इच्छुक उमेदवारांनी अखेरच्या दिवसापर्यंत वाट पाहू नये त्यापूर्वी अर्ज दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. Bank of Baroda Recruitment 2026

पदानुसार पात्रता :
वेल्थ एक्झिक्युटिव – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – IC-38, NISM Series V-A / NISM Series XXI-A, / NISM Series V-D. (iii) 03 वर्षे अनुभव
क्रेडिट अॅनालिस्ट- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
वयोमर्यादा :
वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी, उमेदवारांचे वय २२ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. क्रेडिट अॅनालिस्ट पदासाठी, वयोमर्यादा २१ ते ३३ वर्षे आहे. वयाची गणना १ सप्टेंबर २०२६ रोजीच्या तारखेनुसार केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
इतका पगार मिळेल
बँक ऑफ बडोदाने दोन्ही पदांसाठी आकर्षक वेतनश्रेणी निश्चित केली आहे. वेल्थ एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० ते ₹८५,९२० इतके मूळ वेतन मिळेल. क्रेडिट अॅनालिस्ट पदासाठी, त्यांना ₹६४,८२० ते ₹९३,९६० इतकी मूळ वेतनश्रेणी मिळेल. बँकेच्या नियमांनुसार इतर भत्ते देखील उपलब्ध असतील.
अर्ज शुल्क किती आहे?
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹८५० आहे. एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना ₹१७५ भरावे लागतील. हे शुल्क ऑनलाइन भरणे आवश्यक असून, एकदा भरल्यानंतर ते परत मिळणार नाही.
अर्ज कसा करायचा?
स्टेप 1 : सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजजवरील Careers विभागातील Current Opportunities पेज वर क्लिक करा.
स्टेप 3 : संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करुन नोंदणी करा.
स्टेप 4 : नोंदणीनंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरल्यानंतर पासपोर्टसाईज फोटो, सही आणि रिझ्यूम अपलोड करा
स्टेप 5 : यानंतर ऑनलाइन फी जमा करुन अर्ज जमा करा.











