SSC मार्फत 2536 जागांसाठी मेगाभरती; 12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी

सप्टेंबर 9, 2026 5:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) संयुक्त उच्च माध्यमिक (CHSL) भरतीसंदर्भात भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. विशेष १२वी उत्तीर्ण झालेले आणि सरकारी नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. SSC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण २,५३६ उमेदवारांची भरती केली जाईल.

SSC CHSL Bharti

या भरती प्रक्रियेत डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’, कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता :

पदनिहाय पात्रतेनुसार डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी १२वी उत्तीर्ण आणि Mathematics विषय असणे आवश्यक आहे. तर कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) व आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) पदासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा ही 1 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे अशी आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून General आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. तर SC, ST, PWD, Ex-Servicemen आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

किती पगार मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदावर अवलंबून, ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार वेतन मिळेल. कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) व आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) पदांना वेतन स्तर २ (Pay Level 2) अंतर्गत ₹१९,९०० ते ₹६३,२०० पर्यंत वेतन मिळेल. तर डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदांना वेतन स्तर ४ (Pay Level 4) अंतर्गत ₹२५,५०० ते ₹८१,१०० पर्यंत आणि वेतन स्तर ५ (Pay Level 5) अंतर्गत ₹२९,२०० ते ₹९२,३०० पर्यंत वेतन मिळेल. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’(DEO Grade A) पदांना वेतन स्तर ४ (Pay Level 4) अंतर्गत ₹२५,५०० ते ₹८१,१०० पर्यंत वेतन मिळेल.

महत्त्वाच्या तारखा

SSC भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2026 रात्री 11 वाजेपर्यंत आहे. अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा 14 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत उपलब्ध असेल. भरतीची Tier-I आणि Tier-II परीक्षा कधी होणार, याबाबतची माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now