जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । तुम्हीही स्कॉच आणि बिअर पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ती म्हणजे भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यात एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. ज्यामुळे ब्रिटनहून आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्की आणि इतर मद्यावरील आयात शुल्क तब्बल १५०% वरून निम्म्यावर येणार असल्याने, भारतीयांना आता विदेशी मद्य कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचसोबतच इतर काही वस्तूच्या किमतीही स्वस्त होण्याची शक्यता आहे.

ब्रिटिश व्हिस्की ब्रँड जॉनी वॉकर, चिवास रीगल, ग्लेनफिडिच, सिंगलटन, टॅलिस्कर, ग्लेनमरंगी, ग्रँट्स आणि जुरा भारतात खूप लोकप्रिय आहेत. भारताने त्यांच्यावर लादलेल्या १५० टक्के करमुळे त्यांच्या किमती खूप जास्त आहेत आणि त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. आता कर निम्म्या केल्याने त्यांच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होतील.

स्कॉच व्हिस्की किती स्वस्त होईल?
या ऐतिहासिक करार FTA नंतर, ते तात्काळ प्रभावाने ७५% पर्यंत कमी केले जाईल आणि पुढील १० वर्षांत ते ४०% पर्यंत खाली आणण्याची योजना आहे. असा अंदाज आहे की दर ३० ते ५०% पर्यंत कमी केले जाऊ शकतात. एका अंदाजानुसार, सध्या ३,००० रुपयांना मिळणारी स्कॉच व्हिस्कीची बाटली या करारानंतर १,२०० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकते. तर ४,००० रुपयांची जिनची बाटली १,६०० रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.
काय स्वस्त होईल?
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
शूज, कपडे
सागरी उत्पादने
स्टील
धातू
व्हिस्की (स्कॉच व्हिस्की आणि जिन)
दागिने
फॅशन वस्तू
सॉफ्ट ड्रिंक्स
वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस पार्ट्स
काय महाग होईल?
कार, बाईक्स ऑटो उत्पादने, स्टील उत्पादने, कृषी उत्पादने
या करारानंतर, भारतीय निर्यातदारांनाही चालना मिळेल. या करारामुळे, सुमारे ९९ टक्के भारतीय निर्यातदारांना ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. इतकेच नाही तर सेवा क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.












