केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय ; शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेला मंजुरी, वाचा काय आहेत?

जुलै 16, 2025 5:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२५ । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पीएम धन धान्य कृषी योजनेसे मंजुरी देण्यात आलीय. या नवीन योजनेवर सरकार सुमारे २४,००० कोटी रुपये खर्च करणार आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळेल.

Cabinet meeting

या बैठकीत पहिला आणि सर्वात चर्चेतील निर्णय शुभांशू शुक्ला यांच्या १८ दिवसांच्या आयएसएस भेटीबाबत होता. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचा दौरा अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत झाला आणि त्यांच्या यशस्वी परतीनंतर मंत्रिमंडळाने देशाच्या अंतराळ क्षमता वाढवणाऱ्या या पावलाचे कौतुक केलं. तर दुसरा मोठा निर्णय घेण्यात आला कृषी क्षेत्रातील नव्या योजनेचा.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रातील रोजगाराची कमतरता दूर करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे. यासाठी सरकार कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीद्वारे गावांमध्ये समृद्धी आणि हवामानानुसार अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यावर भर देत आहे.

मंत्रिमंडळात पीएम धन धान्य कृषी योजनेस मंजुरी देण्यात आलीय. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रातील रोजगाराची कमतरता दूर करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे. यासाठी सरकार कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीद्वारे गावांमध्ये समृद्धी आणि हवामानानुसार अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यावर भर देत आहे. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून या योजनेंतर्गत डिजिटल आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १४,२३५ कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित कण्यात आलाय.

यात डिजिटल कृषी मिशन, पीक विज्ञान, पशुपालन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये असे कार्यक्रम समाविष्ट आहेत. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल. या योजनेतून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना विशेष फायदे मिळण्याची अपेक्षा आहे.

तिसरा निर्णय म्हणजे देशाच्या अंतराळ यशाला आणखी बळकटी देणे, भविष्यातील मोहिमांसाठी तांत्रिक आणि आर्थिक संसाधने वाढवण्यावर भर देणे आहे. भारताला अंतराळ महासत्ता बनण्याच्या दिशेने नेणाऱ्या गगनयान आणि इतर प्रकल्पांसाठी इस्रोला पाठिंबा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now