भीषण घटना ! मद्यधुंद डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले

डिसेंबर 24, 2024 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.याच दरम्यान, पुण्यातून एक भीषण घटना समोर आलीय.पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाटा चौकात मद्यधुंद डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. त्यात एक, दोन वर्षांच्या दोन चिमुकल्यांसह एका २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सहा जखमींवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अमरावती येथे राहणारे पवार कुटुंबीय कामाच्या शोधात पुण्यात आले होते. डंपरचालक गजानन शंकर तोटरेला अटक करण्यात आली आहे. त्याने मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेत पैसे मिळत नसल्याची तक्रारही पवार कुटुंबातील महिलांनी केली.

विशाल विनोद पवार (२२), वैभवी रितेश पवार (१) आणि वैभव रितेश पवार (२, सर्व रा. अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. २६ वर्षीय डंपरचालक तोटरे (सध्या रा. केसनंद, ता. हवेली) नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील रहिवासी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now