जळगाव जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधित आलेख सातत्याने उतरताच

मे 30, 2021 7:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील रुग्ण वाढीला मागील गेल्या काही दिवसापासून ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात आज रविवारी दिवसभरात १६१ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ४३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात ०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

corona

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ८२७  बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३१ हजार ३८४  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ५ हजार ९१५  रूग्ण उपचार घेत आहेत. आजच ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २५२८ वर गेला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२१, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-२८, अमळनेर-४, चोपडा-०, पाचोरा-२, भडगाव-१ , धरणगाव-०, यावल-१६, एरंडोल-२, जामनेर-४, रावेर-६, पारोळा-७, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६१  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now