⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | धक्कादायक ! ६५ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

धक्कादायक ! ६५ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथून जवळच असलेल्या सुनोदा येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. ज्ञानदेव जयराम सपकाळे (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, ज्ञानदेव सपकाळे हे नेहमीप्रमाणे शेती कामासाठी तसेच गुराढोरांना चारा आणण्यासाठी सकाळी सायकल घेवून स्वतःच्या शेतात गेले होते. सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचे भाऊ सुरेश सपकाळे यांना ते निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी ही माहिती घरी कळवली. यानंतर प्रमोद सपकाळे यांच्या खबरी वरून निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृत शेतकऱ्यावर सुनोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून हंगाम होत नसल्याने सततच्या नापिकीच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे परिवारातील सदस्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी देखील ही माहिती दिली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह