पेट्रोलसाठी चक्क 500 लिटरची टाकी आणली; मुक्ताईनगरच्या पंपावरील धक्कादायक प्रकार

मार्च 31, 2026 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणुकीचा संशय निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक इंधन भरण्यासाठी रांगा लावत असतानाच एका व्यक्तीने तब्बल ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

muktainagarpump

या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती इंधनाची साठवणूक करून भविष्यात काळाबाजार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाक्यांमध्ये इंधन भरण्यास परवानगी देणे नियमबाह्य असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now