जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीत सर्वांच्या घरी फुलांची सजावट केली जाते. यामुळे झेंडू व गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. हेच पाहता शहरातील फुल व्यावसायिकांनी झेंडूची फुलं विक्री ५० रुपये केलो इतकी केली आहेत. मात्र दसऱ्याला 100 रुपये किलो विकला जाणारा झेंडू आता मात्र 50 रुपये किलो विकला जात आहे. यामुळे नागरिक खुश झाले आहेत.

रविवारी धनत्रयोदशी आणि सोमवारी येणारे लक्ष्मीपूजन यामुळे सजावटीसाठी झेंडूचा मोठा वापर केला जात आहे. जळगाव शहरात विविध ठिकाणी झेंडू येतो. यंदा नाशिकहून येणारा झेंडू याची आवक वाढल्याने यंदा झेंडूची किंमत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना समाधान वाटत आहे.
लहान झेंडू चाळीस रुपये किलो मोठा झेंडू पन्नास रुपये किलो तर शेवंतीची फुले दोनशे रुपये किलो विकली जात आहेत. तर दुसरीकडे गुलाबाचा गुच्छ देखील चाळीस ते पन्नास रुपयांमध्ये विकला जात आहे. यामुळे यंदा नगरिकांची दिवाळी खूप चांगली गेली आहे.