उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना दिलासा; भुसावळ विभागातून १८ विशेष रेल्वे फेऱ्या

एप्रिल 24, 2026 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये बलसाड ते दुर्गापूर, उधना ते दुर्गापूर आणि उधना ते समस्तीपूर दरम्यान एकूण १८ विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने खानदेशातील प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

train

बलसाड – दुर्गापूर विशेष (२ फेऱ्या)

गाडी क्र. ०९१४३ ही २५ एप्रिल रोजी बलसाड येथून दुपारी १२:५० वाजता सुटणार आहे, तर क्र. ०९१४४ ही गाडी २७ एप्रिल रोजी दुर्गापूर येथून सकाळी ७:०० वाजता सुटणार आहे.

उधना – दुर्गापूर विशेष (४ फेऱ्या)

गाडी क्र. ०९१७५ ही २६ व २७ एप्रिल रोजी उधना येथून सकाळी ०८:३५ वाजता सुटेल. तसेच क्र. ०९१७६ ही गाडी २७ व २८ एप्रिल रोजी दुर्गापूर येथून रात्री २३:५० वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित (Unreserved) स्वरूपात चालवण्यात येणार आहे.

उधना – समस्तीपूर विशेष (१२ फेऱ्या)

गाडी क्र. ०९०६९ ही २४, २५, २७, २८, २९ आणि ३० एप्रिल रोजी उधना येथून पहाटे ०५:३० वाजता सुटणार आहे, तर क्र. ०९०७० ही गाडी २५, २६, २८, २९, ३० एप्रिल आणि १ मे रोजी समस्तीपूर येथून सायंकाळी १९:०० वाजता सुटेल.

या सर्व गाड्यांना नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, गया, धनबाद, आसनसोल या प्रमुख स्थानकांवर थांबे आहेत. त्यामुळे सुरत-उधना परिसरातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या तसेच परत येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार असून उन्हाळी सुट्यांतील गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now