४४ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

एप्रिल 6, 2022 6:32 PM

crime 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । हिस्से वाटणीच्या कारणावरून चौघांनी महिलेला मारहाण करत, विनयभंग करून अश्लील शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2021 मध्ये घडली. तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये यावल पोलिसात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डांभूर्णी, ता.यावल येथील पीडीत 44 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शेतीच्या वाटणीच्या कारणावरून 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी पावणेआठ वाजता गावात संशयीत आरोपी नारायण विठ्ठल कुंभार, विठ्ठल धुडकू कुंभार, पल्लवी नारायण कुंभार, वत्सलाबाई विठ्ठल कुंभार या चौघांनी पीडित व तिच्या मुलाला काठीने मारहाण केली. आरोपींनी अश्लील शिविगाळ करीत महिलेचा विनयभंग केला, या आशयाची तक्रार पीडीतेने न्यायालयात दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने यावल पोलिसात चौघांविरुद्ध विनयभंगांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now