⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

धक्कादायक : दोन लाखांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । विष्णापूर येथे माहेर आलेल्या विवाहितेला माहेरहूण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात पतीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी विवाहितेला २ लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ करण्यात आल्याचा देखील आरोप आहे.

तालुक्यातील विष्णापूर येथील माहेर असलेल्या शितल मुकेश पाटील (वय-२५) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मुकेश लोटन पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर पती मुकेश याने विवाहितेला माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार घडली. यासाठी सासरे, सासू, पुतण्या आणि नणंद यांनी पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती मुकेश पाटील, सासरे लोटन हरी पाटील, सासू बेबीबाई लोटन पाटील, पुतण्या करण अनिल पाटील सर्व रा. दुसाने ता साक्री जि. धुळे आणि नणंद शारदा जगदीश सुर्यवंशी रा. तडोदा जि. नंदूरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नशिर तडवी हे करीत आहे.