कट्टर शिवसैनिक हरपला : राजेंद्र दायमा यांचे अकाली निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ भुसावळ शहरा सह तालुक्यात ज्यांनी शिवसेना रुजवली असे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (70) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, 13 रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले. शहरातील टीव्ही टॉवरजवळ त्यांचा निवास होता. मंगळवार, 14 रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल.

damya jpg webp

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परीवार आहे. ते औरंगाबाद हायकोर्टातील अ‍ॅड.निर्मल दायमा यांचे वडील होत. शिवसेनेचा सच्चा व निष्ठावान शिवसैनिक म्हणून राजेंद्र दायमा यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेनेवर असलेली त्यांची निष्ठा पाहता सर्वाधिक काळ त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now