एरंडोल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू

जुलै 13, 2023 1:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया १२ जून २०२३ पासून सुरु करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जूलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. असे आवाहन एरंडोल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

admissions open jpg webp

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरुपात संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे अर्ज नोंदवून झाल्यानंतर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जावून आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रीयेच्या विविध टप्प्याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल, जि. जळगाव येथे खालील अभ्यासक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहे.

मशिनिस्ट, कोपा, इलेक्टॉनिक्स मेकॅनिक, विजतंत्री विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तर दहावी उत्तीर्ण विद्याथ्र्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावा. असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now