
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सध्या भाड्याच्या जागेत असून त्यांच्या करार पुढील वर्षात संपत आहे. नवीन इमारती व राज्य सरकारने मोहाडी येथील महिला रुग्णालयाची जगा आयुर्वेद कॉलेजला द्यावी अशी विनंती कॉलेज प्रशासनाकडून सरकारला करण्यात आली आहे. सध्या मोहाडी रुग्णालयात आयुर्वेद रुग्णालयाची यंत्रणा उपलब्ध आहे.

यासाठी २०२० पासून पाठपुरवठा केला जात आहे. मोहाडीची जागा ५ एकराच्या निषेध पूर्ण करणारी आहे आयुर्वेद रुग्णालयाच्या विनंतीवर सकारात्मक निर्णय न झाल्यास नवीन बांधकाम आणि इतर गोष्टींवर खर्च होणारे शासनाचे २५० ते ३५० कोटी रुपये वाचणार आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोहाडीला महिला रुग्णालयाने आयुर्वेद रुग्णालयाला प्रत्येकी शंभर खाटा आहेत जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या लाटेत सातशे काट्यांचे नियोजन या ठिकाणी केले होते. तेव्हाचा तुलनेत आज बरीच जागा वापरात नाही. जिल्हा रुग्णालयाच्या जागेत तीस कोटी रुपयांचा खर्च महिला व बालकल्याण बांधले जाणार आहे. त्यानंतर मोहाडी येथील महिला रुग्णालया वरील भार हलका होणार आहे.











