वडगाव येथे तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

एप्रिल 6, 2022 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भडगाव तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

hanging jpg webp

अधिक असे की, वडगाव नालबंदी ता. भडगाव जि.जळगाव येथील रहिवासी सोनी उर्फ सविता किरण राठोड (वय-२२) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या का केली या मागील कारण अद्याप कळून आले नाही. सोनी राठोड ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.

५ एप्रिल रोजी घरी कुणीही नसतांना सोनी राठोड हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. सायंकाळी तिचे कुटुंबिय घरी आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. शेजारचांच्या मदतीने तिला भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now