थांबा..!! निंबादेवी धरणावर जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा

जुलै 31, 2023 9:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३। यावल सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले सावखेडा सिम शिवारातील निंबादेवी धरण सध्या प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनले असून ते ओव्हर फ्लो झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. मात्र जर तुम्हीही या धरणावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण निंबादेवी धरणावर पर्यटन प्रेमींची संख्या वाढत असल्याने पयर्टकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

nimbadevi dam jpg webp

निंबादेवी धरण हे जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे. मोशी डॅमची अनुभुती पर्यटकांना याठिकाणी गेल्यावर येते असे पर्यटकांचे म्हणणे आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हे धरणावर यावल, फैजपुर, किनगाव, नायगाव, चुंचाळे, कोरपावली, जळगाव, भुसावळ शहरासह विविध ठीकाणाहुन शहरी जिवनातील गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी आणी निसर्गाशी जोडण्यासाठी ही एक संधी असल्याचे समजुन मोठमोठी डोंगरातुन नैसर्गीक हिरवगार झाडे व नयनरम्य पर्वतास बघण्यासाठी सहलीच्या निमित्ताने बघणाऱ्या पर्यटकांची या ठीकाणी गर्दी होत असते.

भोनक नदीच्‍या उगमस्थानी तयार केलेले निंबादेवी धरण सध्या प्रेक्षणीय पर्यटनस्थळ बनले आहे.अनेक दिवसांपासुन जिल्ह्यातील लाखो पर्यटक हे या आकर्षणाचे केन्द्र असलेल्या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रतिक्षेत होते. सध्या दमदार पावसामुळे ते ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी आहे.

मात्र या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पयर्टकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.काही अप्रीय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने निंबादेवीचे पर्यटनस्थळ पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन धरणाच्या ठीकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे,पोलीस कर्मचारी आणी गृहरक्षकदलाचे महीला व पुरुष कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरीकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने पर्यटकांनी याठिकाणी येवु नये असे आवाहन पोलिसानी केले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now