
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने तब्बल १ हजार ५०० अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. Indian Bank Recruitment 2026
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून मान्यता असलेली समकक्ष शैक्षणिक पात्रताही ग्राह्य धरली जाणार आहे. विशेष म्हणजे, उमेदवाराने १ एप्रिल २०२२ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा किती?
या भरतीसाठी उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वयाची गणना १ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या तारखेनुसार केली जाईल. याचा अर्थ, उमेदवारांचे वय त्या तारखेनुसार निश्चित केले जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि इतर पात्र प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार वयामध्ये सवलत मिळेल
अर्ज करण्यापूर्वी NATS 2.0 वर नोंदणी करा
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी उमेदवारांनी NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा Enrolment ID जपून ठेवावा. भरती प्रक्रियेदरम्यान तसेच भविष्यातील पत्रव्यवहारासाठी या आयडीची आवश्यकता भासू शकते.





