चिंता मिटली! गिरणा धरणाने चौथ्यांदा शंभरी गाठली.. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कचा इशारा!

सप्टेंबर 19, 2022 12:27 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. आनंददायी बाब म्हणजे, गिरणा धरण चौथ्यांदा शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून रविवारी २२ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता हेमंत पाटील यांनी दिला आहे.

mande making 1 1 jpg webp

मागील गुरुवारी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. धरण भरल्यामुळे पिलखोड येथील गिरणा नदीला पुराचे स्वरूप आले आहे, तर बहाळ येथील ऋषिपंथा मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे पुलापलीकडील बहाळ व आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे. नाशिक जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now