उन्हाळा जाणवताच भाज्यांचे भाव वाढले : लिंबू आणि कैरी सुद्धा झाली महाग

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ ।  उन्हाळा जाणवू लागल्याने भाजी मंडईत फळभाज्या व पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे या भाज्यांचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. तसेच उन्हाळा सुरू झाल्याने मंडईत कैरीचे आगमन झाले आहे. तर लिंबूचीही आवक कमी झाली आहे. यामळे भाव वाढले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या वस्तूंना मोठी मागणी असल्यामुळे, या भाज्या महाग झाले असल्याचे दिसून आले आहे.

कृउबामध्ये सद्यस्थितीला सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक होत आहे. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने ही आवक कमी होत आहे. त्यामुळे भेंडी, गिलके, चवळी, दोडके, गवार, टमाटे यांची आवक कमी होत चालली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी होत असल्यामुळे या फळ भाज्या ६० रुपये प्रतिकिलोवर विकले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजीमंडईत सध्या तोतापुरी कैरीचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, आवक फारशी नसल्यामुळे कैरीचे दर ८०. रुपये किलो असल्याचे पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात लिंबूला मोठी मागणी असते. त्यामुळे लिंबूही ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असल्याचे पाहायला आहे.. आता उन्हाळा सुरु झाल्याने भाज्यांचे दर वाढणारच आहेत. त्यामुळे बहुतांश गृहिणी या उन्हाळ्यात डाळींचाच वापर जास्त करत असतात.

बाजारात सुरु असलेले दर
गिलके ६० रु प्रति किलो
दोडके ६० रु प्रति किलो
भेंडी ६० रु प्रति किलो
चवळी ६० रु प्रति किलो
माथी १० रु जुडी
पालक १० रु जुडी
कोथिंबीर १० रु जुडी
पोकळा १० रु जुडी
लिंबू – ६०-८० रु प्रति किलो