रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

जुलै 28, 2026 5:28 PM

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रतिनिधीत्व

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० आयोजित ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभात प्रतिनिधीत्व करीत उत्साहाने सहभाग नोंदविला. हा समारंभ दि. २६ जुलै २०२६ रोजी साताना (जि. नाशिक) येथील सूर्या लॉन्स, तरहाबाद रोड येथे संपन्न झाला.

installation

महाविद्यालयाच्या जान्हवी सोनवणे,रोशनी भाट,क्रिस्टिना डी’सूझा आणि अविनाश डोईफोडे यांनी प्रा. निलेश पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.या समारंभात रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या नव्या नेतृत्वाची स्थापना करण्यात आली. नेतृत्व विकास, मैत्रीभाव आणि निःस्वार्थ सामाजिक सेवेच्या मूल्यांना अधोरेखित करणार्‍या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

त्यांच्या सहभागातून सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि संघभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी, प्राचार्यांनी व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now