⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

मुनमुन दत्ता सोडणार ‘तारक मेहता…’ चा शो? बिग बॉस 16 मध्ये होणार सहभागी?

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस वर्षभर चर्चेत राहतो. बिग बॉसच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. जे दरवर्षी या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, बिग बॉसचा सीझन अजून सुरू झालेला नाही नसला तरी या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणासाठी काही कलाकारांच्या नावांची चर्चा सुरु आहे. या नावांमधे “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेत बबिताचा रोल साकारणा-या मुनमुन दत्ता या अभिनेत्रीचे नाव घेतले जात आहे.

तसेच शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान बिग बॉस 16 होस्ट करण्यासाठी सलमान खूप मोठी रक्कम घेणार आहे. सलमान खानने यापूर्वी कोरोनामुळे त्याच्या फीमध्ये तडजोड केली होती. पण यावेळी भाईजानचा असा कोणताही इरादा नाही. असे मानले जात आहे की यावर्षी सलमान खान 3 पट जास्त फी घेणार आहे. असे झाले तर यावेळी सलमान खान फीच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडताना दिसणार आहे. सलमान खानची बिग बॉस 15 साठी 350 कोटी फी होती. आता यावेळी तो 1050 कोटी घेणार असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणासाठी काही कलाकारांच्या नावांची चर्चा सुरु असून या नावांमधे “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेत बबिताचा रोल साकारणा-या मुनमुन दत्ता या अभिनेत्रीचे नाव घेतले जात आहे. तिच्या नावाची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय अर्जुन बिजलनी, मुनव्वर फारुकी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, टीना दत्ता, अज्मा फल्लाह, शिवम शर्मा, कैट क्रिस्टियन, जन्नत जुबैर, फैजल शेख, आरुषि दत्ता, पूनम पांडे, बसीर अली, जैद दरबार यांची देखील नावे चर्चेत आली आहेत.