जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ मे २०२३ | राज्यात झालेल्या अभुतर्पुव सत्ता संघर्षानंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट र्निमाण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर उद्धव ठाकरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे हे गट आहेत. अशा वेळी दोन्ही शिवसेनेच्या वतीने यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्य़ा जोषात साजरा केला जाणार आहे.
19 जून हा दिवस शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यंदा या शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत.याचा प्रत्यय नुकताच दसऱ्याला महाराष्ट्राला येवुन गेला. दसरा मेळाव्यात दोन दसरा मेळावे राज्याला पाहायला मिळाले होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदाचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून साजरा करा असे दिले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.र्पयायी आता दोन्ही गट वर्धापन दिनाच्या कामाला लागले आहे.
दसरा मेळाव्यात दोन दसरा मेळावे राज्याला पाहायला मिळाले होते. शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला होता. शिवसेनेचा वर्धापन दिन देखील दोन ठिकाणी पार पडणार आहे. दोन्ही गटाच्या वतीने वर्धापन दिनाची तयारी सुरू झाली आहे.