गुरांना चारा-पाणी करताना तरुणास सर्पदंश, प्रकृती स्थिर

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे खळ्यातून गुरां-ढोरांना चारा पाणी करून घरी जात असतांना 35 वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने नागरीकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सविस्तर असे की, युवराज नारायण फेगडे (35) हा तरूण गावा बाहेर असलेल्या खळ्यात गुरा-ढोरांना चारा-पाणी करून रात्री घरी जात होते दरम्यान अंधारात त्यांचा पाय अचानक सापावर पडला व सापाने त्यांच्या उजव्या पायाला दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याना तातडीने नागरीकांनी उपचाराकरीता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. रुग्णालयात डॉ. इरफान खान, डॉ. परविन तडवी, अधिपरिचारिका दिपाली किरंगे बापू महाजन आदींनी उपचार केले.