जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२४ । राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यंत वाढल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. सध्या जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे. मात्र यातच राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचं सावट आहे.
त्यात आज अचनाक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर ढग दाटून आले असून पुढचे तीन तास विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभर वादळीवारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्याला झोडपून काढलं आहे. विदर्भ-मराठवाड्यात तर नदीनाले तुडुंब भरुन वाहत होत. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. येत्या ३ दिवसात मराठवाड्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज, हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.