जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक आज पार पडणार असुन चुरशीची लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.

एक सदस्य मयत झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यापुर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक २ मध्ये ओबीसी जागेवर शिवसेना कार्यकर्ते अजाबराव पाटील निवडुन आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पाटील यांचे निधन झाल्यामुळे हि जागा रिक्त झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये होणारी हि पोटनिवडणूक ओबीसी आरक्षण वादामुळे स्थगित होऊन जनरल करण्यात आल्याने पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या एका जागेसाठी दोन उमेदवार प्रतिस्पर्धी रिंगणात असुन काट्याची लढत रंगणार असल्याची चर्चा असुन नितीन नाना पाटील व विजेंद्र काशिनाथ कोळी या दोन उमेदवारात लढत होणार आहे. रविवारी प्रचार संपला. १८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असुन १९ रोजी मतमोजणी होऊन निकाल समजणार आहे. यापुर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाॅर्ड क्र २ मध्ये या दोंन्ही उमेदवारांना हार पत्करावी लागली होती.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हा हादरला! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खुन केल्याचे लिहिले !
- लोककलेचा जागर करीत मराठी भाषा गौरव दिन साजरा
- जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- जळगावात सौरऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार; जिल्ह्यात उभारला जाणार ३९०० एकर जमिनीवर सौर प्रकल्प
- Jalgaon : आई -वडील बाहेर गावी जाताच युवकाने उचललं नको ते पाऊल ; कुटुंबियांना मोठा धक्का..