जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा आता केवळ कृषी आणि व्यापारासाठीच ओळखला जाणार नाही, तर ऊर्जा उत्पादन आणि व्यवस्थापनातील यशस्वी प्रयोगशील जिल्हा म्हणूनही पुढे येणार आहे. राज्यातील प्रमुख थर्मल पावर तापीय वीज प्रकल्पांपैकी दीपनगर- भुसावळ थर्मल पॉवर प्लांट एक असून येथे सद्य स्थितीला १२१० मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे. तर आता या ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे जळगाव भविष्यात महाराष्ट्राच्या ऊर्जाधारी जिल्ह्यांपैकी एक ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील दीपनगर हे मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणाहून १२०० मेगावॅटहून अधिक वीज निर्मिती केली जात असते. दरम्यान जळगाव हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर आहे. या ‘हॉट’ सिटीमध्ये सौरऊर्जेच्या दिशेने अलीकडच्या काळात मोठे पाऊल टाकले आहे. जिल्हा प्रशासनाचा यात महत्त्वाचा वाटा असून, जिल्ह्यातील अनेक जागा सौरऊर्जा प्रकल्पाला उपलब्ध करून दिल्या आहेत.
३९०० एकर जमीन सौर प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून ९०० मेगावॅट नवीन सौरऊर्जा निर्मिती केली जाईल. एवढी क्षमता आहे. ३२८ मेगावॅट प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहे. तर २० मेगावॅट आधीच कार्यान्वित झाला आहे. यातच अलीकडच्या काळात कृषी आणि घरगुती पातळीवर सौर पंप व छप्परावरील सौर पॅनेलद्वारे अतिरिक्त ऊर्जा निर्मिती होत आहे.
जळगाव जिल्ह्यात दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मितीसह दोन युनिट्स प्रत्येकी ५०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जात आहे. यातील एक युनिट २१० मेगावॅट वीजनिर्मिती करत आहे. तर लवकरच ६६० मेगावॅटचे चौथे युनिट कार्यान्वित होणार आहे. यामुळे जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीची क्षमता वाढणार आहे.