जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । दरमहिन्याच्या एक तारखेला काहीना काही बदल होतात. त्यानुसार आता फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्च महिना सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात. 1 मार्च 2025 पासून अनेक मोठे नियम बदलणार होणार असून या नवीन नियमाचा तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.चला तर मग जाणून घेऊया काय बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल. March Month Change New Rule

एलपीजी किंमत
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत, १ मार्च २०२५ रोजी सकाळी तुम्हाला सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. बदल केलेल्या किंमती १ मार्चला सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जाऊ शकतात.
एफडीवरील व्याजदरात बदल
मार्च २०२५ पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात काही बदल केले आहेत. व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात, आता बँका आपल्या तरलता आणि आर्थिक गरजांनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता ठेवू शकतात. लहान गुंतवणूकदारांवर, विशेषतः ज्यांनी ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो. लहान गुंतवणूकदारांवर परिणाम: ज्यांनी ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली आहे, त्यांच्यावर नवीन दरांचा परिणाम होऊ शकतो.
एटीएफ आणि सीएनजी-पीएनजी दर
दरम्यान, दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती देखील बदलतात.
सेबीने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांच्या सुधारणेसाठी नवीन नियम
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने म्युच्युअल फंड फोलिओ आणि डिमॅट खात्यांसाठी नामांकन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. 1 मार्च 2025 पासून लागू झालेले नवीन सुधारित नियम, विशेषतः गुंतवणूकदाराच्या आजारपण किंवा निधनाच्या बाबतीत, मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार केलेले आहेत.