---Advertisement---
बातम्या गुन्हे जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा हादरला! वडिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये रील स्टार मुलाच्या खुन केल्याचे लिहिले !

---Advertisement---

वडिलांच्या सुसाईड नोटने उलगडला मुलाच्या मृत्यूचा रहस्यभेद !

vikki hitesh patil

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील धरणगाव-एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले की त्याने रील स्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात पुरला आहे.

---Advertisement---

प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय 22, रा. भोरखेडा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विठ्ठल सखाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते.

विकी पाटीलचे वडील विठ्ठल सखाराम पाटील (माजी सैनिक) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये “माझ्या मुलाचा खून केला असून, त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे,” असे लिहिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

धरणाजवळ मृतदेह सापडला
सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली?याचं कारण मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे.

वडिलांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांनी पाहणी केली असून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment