जळगाव लाईव्ह न्यूज । सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सिकंदर’चा टीझर रिलीज झाला आहे.या चित्रपटाच्या टीझरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सलमान खजानचा हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खानचा सर्वात मोठा चित्रपट ‘सिकंदर’चा टीझर २७ फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी रिलीज झाला आहे. ‘गजनी’ चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस दिग्दर्शित ‘सिकंदर’ या चित्रपटात सलमानच्या सोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये भाईजानचा स्वॅग पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून भाईजानचे चाहते खूपच उत्सुक दिसत होते, तर टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. सिकंदरच्या टीझरमध्ये सलमान खानचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये त्याला पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. त्याचबरोबर या टीझरचे सर्वजण खूप कौतुक करत आहेत.